भुसावळ : किरकोळ कारणावरून दोघा भावांवरच एकाने सुरीने हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास न्यू ईदगाह परीसरात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
राग आल्याने सुरीने केला हल्ला
काझी उजीनोद्दीन अनवोद्दीन हे व त्यांचे भाऊ काझी इकरामोद्दीन अनवरोद्दीन (30) हे रस्त्याने जात असतांना नबी खाटीक यांनी अंगणवाडी सेविका लहान मुलांचे मिळणारे धान्य देत नाही, असे विचारल्याचा राग आल्याने अंगणवाडी सेविकेकडेच याची चौकशी करा, असे सांगितल्याचा राग आल्याने खाटीक यांनी घरात असलेल्या सुरीने दोन्ही भावांवर वार केल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात काझी उजीनोद्दीन अनवरोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नबी खाटीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समाधान पाटील पुढील तपास करीत आहे.