भुसावळात दोन गटात दंगल : 13 जणांविरोधात गुन्हा

आरोपींमध्ये माजी नगरसेवकासह भावाचा समावेश : परस्परविरोधी तक्रार

भुसावळ : किरकोळ कारणावरून दोन गटात वाढलेला शाब्दीक वाद हाणामारीवर पोहोचल्यानंतर या प्रकरणी दोन्ही गटाने बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन्ही गटातील 13 आरोपींविरोधात दंगल व अन्य कलमान्वये सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये माजी नगरसेवक प्रकाश (निकी) बत्रा यांच्यासह त्यांच्या भावासह अन्य आरोपींचा समावेश आहे.

फोन केल्याचा राग आल्याने मारहाण
पहिल्या गटातर्फे अशोक चंद्रलाल चुगेजा (सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी तक्रार दिल्यानुसार आरोपी प्रकाश रमेशलाल बत्रा, विकी रमेशलाल बत्रा, सनी अनिलकुमार बत्रा, ओम सुनीलकुमार डूबा, मनीष राजकुमार रत्नानी, राकेश गोपालदास कुकरेजा, तरुण अशोककुमार कुकरेजा, गुलचंद सुनीलकुमार डूंबा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवार, 1 एप्रिल रोजी तक्रारदार जेवण झाल्यानंतर बाहेर फिरण्यासाठी आल्यानंतर भगवान झुलेलाल यांची प्रतिमा असलेला कंदील खाली पडल्याचे दिसल्याने त्यांनी संशयीत निकी बत्रा यांना फोन केला व माहिती दिली व त्यानंतर बत्रा यांनी मी तेथे येतो, असे म्हणत फोन कट केला व येवून संशयीतांसह बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दुसर्‍या गटाच्या पाच जणांविरोधात गुन्हा
दुसर्‍या गटातर्फे माजी नगरसेवक प्रकाश रमेशलाल बत्रा (37, पूजा डेअरीसमोर, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून अशोक चंद्रलाल चुगेजा, कुणाल दिलीपकुमार छाबडीया, दिलीपकुमार गोवर्धनदास छाबडीया, नारायण अशोक ठारवानी, गौतम अशोक चुगेजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बत्रा यांना मुकेश पिंजवानी यांनी फोन करून संशयीत गुरूनानम मेडिकलजवळ शिविगाळ करीत असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी जावून जाब विचारल्यानंतर त्यांना आरोपींनी दारूच्या शिविगाळ करून मारहाण केली. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सत्तार शेख करीत आहेत.