भुसावळात दोन दिवसात होणार पालिकेकडून फवारणी

0

ट्रॅक्टर मागवले : वर्दळीच्या रस्त्यांसह प्रभागनिहाय होणार फवारणी

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी सर्वत्र फवारणी होत असलीतरी भुसावळात मात्र फवारणी होत नसल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्‍वभूमीवर भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून फवारणीसाठी अत्यावश्यक यंत्रणा मागवण्यात आली असून येत्या एक वा दोन दिवसात शहरातील वर्दळीचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच प्रभागात सोडियम क्लोराईडद्वारे फवारणी होणार असल्याचे मुमख्याधिकारी करुणा डहाळे म्हणाल्या.

पालिकेने तातडीने दखल घेण्याची अपेक्षा
जिल्ह्यात सर्वच पालिका क्षेत्रात सोडियम क्लोराईडद्वारे फवारणी केली जात असून भुसावळ मात्र अद्यापही फवारणी होत नसल्याने नागरीकांमधून पालिका प्रशासन तसेच स्थानिक नगरसेवकांविषयी रोष व्यक्त होत होता. किमान नगरसेवकांनी तरी प्रभागातील नागरीकांच्या आरोग्याचा विचार करून स्वतःहून फवारणी करण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. काही नगरसेवकांनी स्वतः पदरमोड करून प्रभागात फवारणी केली तसेच काही ठिकाणी सुरूदेखील आहेत त्यामुळे अन्य नगरसेवकांनीही हीच जनसेवेची संधी समजून पुढाकार घेण्याची माफक अपेक्षा भुसावळकर नागरीक व्यक्त करीत आहेत. पालिका प्रशासनानेही तातडीने शहरात फवारणी सुरू करण्याची अपेक्षा आहे.