भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोघा अल्पवयीनांकडून दोन लाख रुपय किंमतीचा सुमारे 20 किलो गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस रविवारी दुपारी 3.15 वाजता आल्यानंतर दोन अल्पवयीन मुलांजवळील दोन गाठोडे प्लॅट फॉर्मवर सोडल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी ते तपासल्यानंतर त्यात गांधी आढळल्याने खळबळ उडाली. गांजा घेऊन जाणारे दोन अल्पवयीन मुलगा व मुलगी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर यावेळी तिसरा संशयीत पसार झाला आहे. रात्री उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफचे निरीक्षक आर.के.मीणा, निरीक्षक एस.व्ही.थोरात, उपनिरीक्षक संजय साळुंखे, सहायक फौजदार मधुकर न्हावकर, सचिन गुप्ता, राजेश गवई, आरपीएफचे दिलीप जाधव, वसंत महाजन, सुनील इंगळे, सहायक फौजदार भरत शिरसाठ, अजित तडवी, दिवाणसिंग राजपूत, धनराज लुल्हे, विकास पाटील यांनी कारवाई केली.