भुसावळात दोन समाजात तेढ निर्माण केल्याने रेल्वे कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : शहरातील रेल्वे कर्मचार्‍याने दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट व्हॉटस्अ‍ॅपवर टाकल्याने त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी सुरेश लक्ष्मण विसपुते (गजानन महाराज नगर, प्लॉट नंबर आठ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी विसपुते यांनी भुसावळातील जयहिंद ग्रुप भुसावळ दोन या सोशल मिडीया ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा संदेश 4 रोजी सायंकाळी चार वाजून नऊ मिनिटांनी टाकल्याने त्यांच्याविरुद्ध भादंवि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद पाटील, हवालदार संजय पाटील, मोहन पाटील यांनी ही कारवाई केली.