भुसावळ- नाशिक जिल्ह्यातून पश्चिम बंगालकडे निघालेल्या द्राक्षाचे ट्रक सोमवारी पहाटे फेकरी टोलनाक्याच्या परिसरातील वळणावर थेट डिव्हाईडवर चढून उलटल्यानंतर सोमवारी सकाळी द्राक्षांची लूट करण्यासाठी परिसरातील नागरिकांची झूंबड उडाली. नाशिक जिल्ह्यातून द्राक्षांनी भरलेला ट्रक (क्रमांक डब्लूबी 23 डी 7581) हा ट्रक पश्चिम बंगालकडे निघाला होता. पहाटे फेकरी टोल नाक्याजवळ फेकरी गावाकडे जाणार्या वळण रस्त्यावर अंदाज न आल्याने हा ट्रक थेट डिव्हाईडवर चढून उलटला. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी धाव घेतली. ट्रकचा चालक शालिकग्राम ओझा यास पायाला किरकोळ दुखापत झाली, सुदैवाने जिवित हानी टळली. सकाळी रस्त्यावर पडलेला ट्रक पाहून परिसरातील नागरिकांनी द्राक्षाचे कॅरेट उचलून पळ काढला. या प्रकरणी पून्हा चालकाने पोलिसांना माहिती दिल्याने एका पोलिस कर्मचार्यास तैनात करण्यात आले.