भुसावळात धनगर समाजाचा प्रांत कार्यालयासमोर येळकोट-येळकोटचा गजर

0

धनगर समाज आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात दिले निवेदन

भुसावळ – घटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजाचा अनुसुचीत जाती प्रवर्गामध्ये समावेश आहे.मात्र राज्यातील धनगर समाजाला उदासिन राज्यकर्त्यांनी अनुसुचीत जमातीच्या सवलीतीपासुन 65 वर्षापासून वंचीत ठेवले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर धनगर समाजाला अनुसुचीत जमातीच्या सवलती त्वरीत लागू करू असे आश्‍वासन दिले होते.मात्र चार वर्षाचा कालावधी होवूनही धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती सुरू झाल्या नाहीत.यासाठी धनगर समाजाने राज्यभर आंदोलन सुरू केले असून आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवारी तालुक्यातील धनगर समाजाच्या पदाधिकार्‍यांनी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर येळकोट -येळकोट जय मल्हारचा गजर करीत अनोखे आंदोलन केले.

प्रांताधिकारी कार्यालयात मागणीचे दिले निवेदन
राज्य शासन धनगर समाजाला अनुसुचीत जमातीच्या सवलती देण्यास टाळाटाळ करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेले सवलतीच्या शब्दांची तातडीने पुर्तता करावी यासाठी महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहे.याची राज्यकर्त्यांनी त्वरीत दखल घ्यावी अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले.

आंदोलनात यांचा होता समावेश
प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या जागर आंदोलनात सुकलाल धनगर, मनोज मोरे, मधुकर वैदकर , शामराव धनगर , भारत ठाकरे, प्रमोद धनगर , रमेश धनगर , बंडु हडपे , संजय तायडे , एकनाथा जुंबळे , स्वप्नील सावळे , गजानन धनगर , सुकदेव धनगर , विलास धनगर , विशाल भागवत , रेवा धनगर, विशाल ठोके , अ‍ॅड. सत्यनारायण पाल , सुनिल धनगर, नामदेव गायकवाड ,अनिल मंडलीक यांची उपस्थिती होती.