भुसावळात धूमस्टाईल शिक्षिकेचे मंगळसूत्र लांबवले : दोघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : शहरातील प्रभात कॉलनी परीसरात गेटबाहेर दुचाकी लावत असलेल्या के.नारखेडे विद्यालयाच्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातून चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सात ग्रॅम वजनाचे व 25 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना बुधवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी दुसर्‍या दिवशी गुरुवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोघा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. के.नारखेडे विद्यालयाच्या शिक्षिका नेहा सुनील पाटील (प्लॉट नंबर चार, प्रभात कॉलनी, भुसावळ) या गेटबाहेर दुचाकी लावत असताना दुचाकीवरून आलेल्या पांढरा व हिरव्या रंगाचा चेक्सचा शर्ट घातलेल्या 35 ते 40 वयोगटातील आरोपींनी नेहा पाटील यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले होते तर पाटील यांनी मंगळसूत्र धरून ठेवल्याने चोरट्यांच्या हाती केवळ सात ग्रॅमचे पेंडल लागल्याने त्यांनी ठोके नगराच्या दिशेने धूम ठोकली होती. या प्रकरणी दोघा अज्ञात चोरट्यांविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साहिल तडवी करीत आहेत.