भुसावळात धूम स्टाईल चोरी: तक्रारदारांनी ओळखले आरोपींना

0

भुसावळ– धूम स्टाईल येत सोनसाखळी व पर्स लांबवणार्‍या विजय राजू मंटू व पॉल व्हिल्सन बनॉल यांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्यानंतर बुधवारी त्यांची कारागृहात ओळख परेड घेण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, नायब तहसीलदार सपकाळे, मूळ फिर्यादी सुमन पाटील यांची प्रसंगी उपस्थिती होती. दरम्यान, आरोपींनी जुन्या उपअधीक्षक कार्यालयासमोरून जाणार्‍या अनिता वंजारी यांची पर्स लांबवली होती. या गुन्ह्यात आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.