भुसावळ : धूम स्टाईल येत वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवल्याची घटना शहरातील गरूड प्लॉट भागात सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. तक्रारदार सुमनबाई विनायक पाटील (67, गरूड प्लॉट, भुसावळ) या घराकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची पोत लांबवली. घटना कळताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले व सहकार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.