भुसावळ- शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याची घटना घडल्याने महिलावर्गात खळबळ उडाली आहे. तक्रारदार चारूशीला शैलेश विसे (प्लॉट नंबर 193/1, गडकरी नगर, भुसावळ) या 13 रोजी सकाळी पावणेआठ वाजता मुलाला शाळेत सोडण्यासाठी व्हॅनजवळ जात असताना धूम स्टाईल आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे व 60 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले. काही कळायच्या आत चोरटे दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहा.निरीक्षक मनोज पवार आदींनी घटनास्थळी भेट देवून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांच्या शोधासाठी या परीसरातील सीसीटीव्हीचा आधार घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास उपनिरीक्षक मनोज ठाकरे करीत आहेत.