भुसावळात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न फसला

0

भुसावळ : शहरातील पवन नगर, प्रभात कॉलनी परीसरात गेटबाहेर दुचाकी लावत असलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातून चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने सतर्कता दाखवत मंगळसूत्र हातात धरून ठेवल्याने केवळ पदक लांबवत चोरटे पसार झाले. बुधवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात वारंवार धूम स्टाईल मंगळसूत्र चोरीचे प्रकार घडत असल्याने चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील के.नारखेडे विद्यालयात शिक्षिका असलेली महिला घरी परतल्यानंतर घराबाहेर दुचाकी लावत असताना दुचाकीवर आलेल्या 30 ते 35 वयोगटातील दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लक्ष विचलीत करून मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र शिक्षिकेने दाखवलेल्या सतर्कतेमुळे केवळ पदकच चोरट्यांच्या हाती लागले. या घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अद्याप महिलेने शहर पोलिसात तक्रार दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.