भुसावळ- शहरात व्यवहारात दोन हजारांच्या नकली नोटा चलनात आल्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील पत्रकार प्रेम परदेशी यांना त्याबाबत फटका बसला. सोमवार, 14 रोजी युको बँकेत ते भरणा करण्यासाठी गेल्यानंतर रोखपालाने भरण्यातील दोन हजार रुपयांची नोट नकली असल्याचे सांगताच परदेशी यांना धक्का बसला. बाजारपेठ अथवा अन्य ठिकाणाहून ही नोट चलनात आल्याचे सांगण्यात आले. शहरातील नागरीकांनी व्यवहार करताना तसेच पैशांची देवाण-घेवाण करताना नोटेची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. शंका आल्यास जाणकारांकडून नोट तपासून घ्यावी जेणेकरुन फसवणूक टाळता येईल, असे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले. युको बँकेचे वरीष्ठ व्यवस्थापक पवनकुमार सिंह यांनी नकली नोटा कधीतरी चलतान येत असल्याचे सांगत नोटेवर डुप्लीकेट लिहून नोट बाद केली.