भुसावळ- लोकसभा निवडणुकीकच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी करीत संशयास्पद वाहनांची तपासणी केल्यानंतर दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये चार हजार 368 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पहिली कारवाई रेल्वे स्टेशन परीसरात करण्यात आली. संशयीत आरोपी रवींद्र भास्कर कोळी (40 रा.कोळीवाडा, पाडळसा) याच्या ताब्यातून दोन हजार 496 रुपये किंमतीची टँगो दारू जप्त करण्यात आली तर दुसर्या कारवाईत लक्ष्मण राजाराम तडसकर (31, रा.चोरवड, ता. भुसावळ) याच्या ताब्यातून एक हजार 872 रुपये किंमतीची देशी टँगो दारू जप्त करण्यात आली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास सुनील थोरात व दीपक जाधव करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक सारीका खैरनार, एएसआय अंबादास पाथरवट, सुनील थोरात, दीपक जाधव, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील आदींच्या पथकाने केली.