भुसावळ- नागरीकत्व दुरुस्ती कायदा (एनआरसी व सीएए) रद्द करा, अशी मागणी संविधान बचाव समितीने करीत बुधवारपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी साखळी उपोषणाचा दुसरा दिवस होता. या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. सुधारीत नागरीकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन दिल्ली पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. सरकारने आणलेला नागरीकत्व दुरुस्ती कायदा घटनाबाह्य आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी संविधान बचाव समितीने केली आहे. या मागणीसाठी बुधवारपासून तहसीलसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
यांनी उपस्थित राहत दर्शवला पाठिंबा
प्रसंगी गुरुवारी पीआरपीचे जगन सोनवणे, जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, शीख समाजाचे मेजरसिंह गील, जैन समाजााचे जे.बी.कोटेचा, रमेश जैन, भीम आर्मीचे भुरा सपकाळे, जमाते ईस्लामे हिंदचे गफ्फार खान, सैय्यद साहब, डॉ.नईम, संविधान बचाओ समितीचे अध्यक्ष सलीम शेठ चुडीवाले, नगरसेवक सलीम पिंजारी, नसीम तडवी, डॉ.ईम्रान, काँग्रेसचे शैलेंद्र नन्नव्वरे, साबीर मेंबर, फिरोज भाई, अजहर भाई, दानीस पटेल, नाबीना हाफीज, जुनेद खान, शिवसेनेचे अबरार ठाकरे, राजु चौधरी, रईस मेंबर, साजीद बागवान, अशरफ कुरेशी, आबीद भाई, युनूस मामा, अशरफ खान यांच्यासह अनेकांनी साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शवला.