भुसावळात नाना-नानी उद्यानाचा शुभारंभ

0

भुसावळ- आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील वेडिमाता मंदिर रस्त्यावरील काशीराम नगरात स्व.अटलबिहारी वाजपेयी नाना-नानी उद्यानाचा शुभारंभ माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते सायंकाळी झाला. प्रोफेसर कॉलनीतील महादेव मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठांना काठी वाटप तसेच लग्नास 50 वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांना भेटवस्ते देवून सन्मानीत करण्यात आले तसेच चिमुकल्यांना खेळण्यांचे वाटप करण्यात आले.

यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, राजेंद्र नाटकर, किरण कोलते, पिंटू कोठारी, महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर पुरूषोत्तम नारखेडे, प्रमोद सावकारे, दीपक धांडे, दिनेश नेमाडे, मनोज बियाणी, मेघा वाणी, शोभा नेमाडे, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष डी.एन.ढाके, राजेंद्र आवटे, सतीश सपकाळे, रजनी सावकारे, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा मीना लोणारी यांची उपस्थिती होती.