भुसावळात निदर्शने, आंदोलनाने गाजला दिवस

0

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पंतप्रधान मोदींची प्रतिमा जाळली

भुसावळ : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या जय भगवान गोयल लिखीत पुस्तकाच्या प्रकाशनानंतर देशभरात संतापाची लाट पसरली असून या पुस्तकावर बंदी आणावी तसेच प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे तहसील कार्यालयाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेले बॅनर जाळून निषेध करण्यात आला तर जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फेही प्रशासनाला निवेदन देण्यात आले तर बोदवडमध्ये मुस्लीम समाजबांधवांनी प्रशासनाला निवेदन दिले.

भुसावळात पंतप्रधानांच्या छबीचे बॅनर जाळले
भुसावळ- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे यावल रस्त्यावरील तहसील कार्यालयापर्यंत मंगळवारी दुपारी अडीच वाजता पायी मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली तसेच तहसील कार्यालयाबाहेर पंतप्रधानांची छबी असलेले बॅनर जाळण्यात आले. प्रसंगी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्षा नंदा निकम, मीनल पाटील, मीनाक्षी चव्हाण, अर्चना कदम, कमल पाटील, ममता तडवी, शोभा भोयटे, जुलेखा, संदीपा वाघ तसेच प्रकाश निकम उपस्थित होते.

जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी
भुसावळ- जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला मंगळवारी निवेदन देण्यात आले तर पदाधिकार्‍यांनी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत संताप व्यक्त केला. याप्रसंगी जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग व भुसावळ युवक काँग्रेस तसेच वरणगाव शहर काँग्रेसच्या वतीने जय भगवान लिखीत पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. गोयल यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, जिल्हा काँग्रेस कमेटी सरचिटणीस रहिम मुसा कुरेशी, भुसावळ विधानसभा युथ काँग्रेस अध्यक्ष इम्रान खान इद्रीस खान, वरणगाव शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष अशपाक काझी, अल्पसंख्यांक विभाग प्रदेश सचिव के.बी.काझी यांच्यासह ईस्माईल गवळी, राजेंद्र श्रीनाथ, जॉनी गवळी, संजय खडसे, रमेश जैन, जे.बी.कोटेचा, मकरूद्दीन बोहरी, राजेंद्र पटेल, आशिक सैय्यद, शेख सिराज, कामील खान आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

भुसावळ शहर काँग्रेस कमेटी
भुसावळ- भुसावळ शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रवींद्र निकम यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देवून जय गोयल लिखीत पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर भगवान मेढे, जया फ्रान्सीस, विलास खरात, संतोष साळवे, राणी खरात, रेखा सोनवणे, शैलेंद्र अहिरे, महेंद्र महाले आदींची नावे आहेत.

जय भगवान गोयल तर विकृत लेखक
भुसावळ- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करण्याचा प्रकार विकृत लेखक जय भगवान गोयल यांनी केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली आहे. निवेदन देताना उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, भुसावळ तालुकाध्यक्ष पंकज पाटील, तालुका सरचिटणीस विवेक नरवाडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, राजू पालिमकर, प्रवीण पाटील, जयंत सुरपाटणे, नितीन पटाव, ईस्माईल गवळी, भगवान मेढे, सुखदेव सोनवणे, प्रदीप कोळी, अर्जुन पाटील आदी उपस्थित होते.

बोदवडमध्ये मुस्लीम बांधवांचे निवेदन
बोदवड- मुस्लिम समाजातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दिल्लीत झालेल्या संत संमेलनात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भाजपचे नेते जय भगवान गोएल यांनी हे पुस्तक लिहिले असून पुस्तकात महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेले व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदींची तुलना करण्यात आल्याने छत्रपती शिवरायांवर प्रेम करणार्‍यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जय भगवान गोएल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नईम खान, अय्युब कुरेशी, कलिम शेख, रोहित पोल, नितीन पाटील, शेख अफ्रिदी, समीर पिंजारी, शकील शेख, जिया शेख आदींची उपस्थिती होती.