भुसावळात नियम मोडणार्‍यांवर पालिका पथकाकडून कारवाईचा बडगा

0

भुसावळ : शहरात सातत्याने वाढणारी कोरोनाची संख्या पाहता प्रशासनाने विविध व्यावसायीकांनी गर्दी टाळण्यासाठी दुकाने उघडण्याचे दिवस ठरवून दिले आहेत मात्र काहींनी नियम डावलल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरातील सिंधी कॉलनीतील महादेव प्रोव्हीजन सुरू असल्याची माहिती पालिकेच्या पथकाला मिळाल्यानंतर या दुकानाला सील ठोकण्यात आले तसेच सोशल डिस्टन्स न पाळणार्‍या हुसेनी हॉर्ड वेअर, ए वन टी सेंटर व जहीर डेअरी कोल्ड्रींक्सच्या संचालकांना दंड करण्यात आला त्या शिवाय मास्क न लावणार्‍या तिघांवर कारवाईसह नगरपालिका दवाखान्याशेजारील पाच भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पालिकेचे अभियंता पंकज पन्हाळे, संजय बाणाईते, शेख परवेज अहमद, चेतन पाटील, रामदास म्हस्के, राजीव वाघ, विशाल पाटील, महेश चौधरी, अनिल भाकरे, राजेश पाटील, किरण मनवाडे, विजय राजपूत, योगेश वाणी, अनिल मनवाडे, गोपाल पाली व पोलिस कर्मचारी दीपक शिंदे, चारूदत्त पाटील आदींच्या पथकाने केली.