भुसावळात नोटीस जाळली : महाविकास आघाडी सरकारचा निषेध

भुसावळ : महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात पोलिस बदल्यांचा घोटाळा उघड करणारे

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस दिल्यानंतर भारतीय जनता पार्टी संपूर्ण राज्यभरात आक्रमक झाली आहे. भुसावळात पदाधिकार्‍यांनी नोटीसीच्या प्रती जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत रविवारी जोरदार घोषणाबाजी केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, लक्ष्मण सोयंके राजू खरारे, नारायण रणधीर, राजेंद्र आवटे, खुशाल जोशी, पवन बुंदेले, दिनेश उपाध्याय, प्रवीण इखनकर, विनोद पचेरवाल, बाळू कोळी, मनोज पिंपळे, सतीश सपकाळे, विशाल जंगले, अर्जुन खरारे, राहुल तायडे, मुकुंदा निमसे, शिशिर जावळे, रवींद्र ढगे, संजय बोचरे, चंद्रशेखर पाटील, प्रा.विलास अवचार, रवींद्र दाभाडे, अनिरुद्ध कुलकर्णी, भावेश चौधरी, चेतन सावकारे, लोकेश जोशी, गोपीसिंग राजपूत, श्रेयस इंगळे, संतोष ठोकळ, अमोल पाटील, मयुर सावकारे, सागर जाधव, प्रशांत भट, संकेत चौधरी, अक्षय जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.