भुसावळात न्यायायालयाच्या आवारातून वकीलाची दुचाकी लंपास

0

भुसावळ- शहरातील अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या आवारातून वकीलाचीच दुचाकी चोरट्यांनी लांबवली. गेल्या काही दिवसांपासून न्यायालय आवारात दुचाकी लांबवल्याचे प्रकार वाढल्याने पक्षकारांसह वकीलांमध्ये चिंता पसरली आहे. पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तक्रारदार अ‍ॅड.राजेंद्र जानकीलाल शर्मा (55, गांधी नगर, डी.एल.हिंदी हायस्कूलमागे) यांच्या मालकीची व 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच. 19 बी.ई. 4887) चोरट्यांनी 28 जून रोजी दुपारी दिड त सायंकाळी साडेचार दरम्यान लांबवली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. तपास प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गजानन देशमुख करीत आहेत.