भुसावळ- अतिरीक्त सत्र न्यायालयातील कर्मचारी योगेश बाविस्कर हे घरी जात असतांना मंगळवारी रात्री घोडेपीर बाबा रस्त्यावर दोन जणांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या खिश्यातील दोन हजार रूपये हिसकावून घेतले होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली. हेमंत जगदीश पैठणकर (24, रा.तुकाराम नगर, भुसावळ) व विशाल प्रकाश पाचपांडे (21, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गुप्त माहितीवरून कारवाई
गुन्हा घडल्यानंतर संशयीत पसार झाले होते तर आरोपी नाहाटा महाविद्यालयाजवळील जलकुंभाजवळ आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, हवालदार युवराज नागरुत, सुनील थोरात, नरेंद्र चौधरी, कृष्णा देशमुख, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, सचिन चौधरी, उमाकांत पाटील, योगेश माळी, बंटी कापडणे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.