भुसावळात न्यायालयासमोर हाणामारी : चौघांना अटक

0

भुसावळ- भुसावळ न्यायालयासमोर केळीची साल टाकल्यानंतर त्याबाबत वाहनधारकाने हटकल्यानंतर त्यास मारहाण करणार्‍या चौघांना अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मौसीम शेख, बिलाल शहा, शेख अब्बास, शेख सद्दाम सर्व (रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक मनोज ठाकरे, हवालदारा संजय पाटील, समाधान पाटील, प्रेम सपकाळे, प्रशांत चव्हाण, यासीन पिजांरी, नरेंद्र चौधरी आदींनी ही कारवाई केली. आरोपींनी सार्वजनिक जागी शांततेचा भंग केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.