भुसावळ– खावटीची केस मागे घ्यावी म्हणून पतीनेच पत्नीवर काचेची बाटली मारून हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दिड वाजता अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या गेटवर घडली. या प्रकरणी चंदना दीपक तायडे (42, गणपती नगर, वरणगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती दीपक तुळशिराम तायडे (वढोदा, पानेरा, ता.मलकापूर) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चंदना या पतीपासून विभक्त राहतात व पतीने छळ केल्याने त्याच्याविरुद्ध वरणगाव पोलिसात 498 ची केस करण्यात आली आहे शिवाय पतीपासून खावटी मिळावी म्हणून केस सुरू असल्याने तारखेसाठी त्या भुसावळ न्यायालयता आल्यानंतर दिड वाजेच्या सुमारास पतीने उजव्या कानाजवळ काचेची बाटली मारल्याने त्या रक्तभंबाळ झाल्या. पतीने चाकूने ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.