भुसावळ– पत्नीनेच पतीवर सुरी मारून हल्ला केल्याची घटना शहरातील द्वारकानगरात घडली. या प्रकरणी पत्नीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहनसिंग गणेशसिंग ठाकूर (26) यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून त्यांची पत्नी मोनिका ठाकूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 8 जानेवारी रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आपण जीवाचे बरे-वाईट करू, असे सांगत पत्नीने महिला दक्षता समितीकडे तक्रार केली आहे. पत्नीने स्वयंपाक न बनवल्याने 8 रोजी आईकडे जेवायला आपण जात असताना मुलीला घेऊन का जात नाही म्हणून पत्नीने झाडूने मारहाण केली तसेच चाकूरदेखील मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.