भुसावळात परवानगीविना फनी फिल्म बनवणार्‍यांविरुद्ध अखेर गुन्हा

0

भुसावळ- शहरातील जाम मोहल्ला भागातील रजा टॉवर चौकात एअरगन काढून स्थानिक कलावंत चित्रीकरण करत असताना अफवांचे पेव फुटल्याने पोलिसांनी सहा कलावंतांना शनिवारी रात्री ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर सहा कलावंतांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

विना परवानगी चित्रीकरण पडले महागात
भुसावळातील स्थानिक सात कलावंतांद्वारे यु ट्यूब चॅनलसाठी ‘रईस’ चित्रपटाची फनी शॉर्टफिल्म बनवण्यासाठी रजा टॉवर चौकात शनिवारी दुपारी चित्रीकरण सुरू असताना एअर गनमुळे नागरीकांमध्ये दहशत पसरल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. चित्रीकरणासाठी कलावंतांनी कुठलीही परवानगी न घेताच चित्रीकरण केल्याने पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी कर्मचार्‍यांना फैलावर घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. पोलिस कर्मचारी विनोद वितकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात अझहर शेख नबी (रा.ग्रीन पार्क, भुसावळ), इम्रान खान मुसाखान, शे वसीम शेख शकील, शेख मोमीन शेख इकबाल, शेख मुरबील शेख सलीम, अझर शकील कुरेशी (सर्व रा.भुसावळ) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून जामीनावर सोडण्यात आले. पोलिसांनी 500 रुपये किंमतीची एअर गन जप्त केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग पुढील करीत आहेत.