बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे हाच उद्देश -संतोष बारसे
भुसावळ- बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी शहरातील वाल्मीक चौकात पहेलवान पूत्र ग्रुपच्या वतीने पहेलवान पुत्र ग्रुप सब्जी भाजी दुकानासह पहेलवान पुत्र ग्रुप बकरा मटण दुकानाचे उद्घाटन नगरसेविका सोनी संतोष बारसे व माजी नगरसेवक तथा पहेलवान पुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष बारसे यांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील बेरोजगार बांधवांना रोजगार उपलब्ध करून देणे हाच आपल्या ग्रुपचा उद्देश असून ग्रुपच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात महाराष्ट्रातील गावा-गावात शाखांचे उद्घाटन होईल व या माध्यमातून युवकांचे संघटनही केले जाईल, असेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
विक्की आबा जाधव, अर्जुनभाई जावडे, रामभय्या कलोसे, कमलभाई घारू, चंदन घारू, आशूभाई पोल, चेतनभाई नरवाडे, गब्बरभाई चावरीया, अॅड.बोधराज चौधरी, सनीभाई चांगरे, पापाशेठ वागरे, विजय पवार, अमोलभाई तांबोळी, विनोदभाई पचेरवाल, अमित खरारे, आतीशभाई सारवान, गजुभाऊ खोडके, संभाजी जाधव, अनिल गंगतीरे, पहेलवान पुत्र ग्रुपचे कार्यकर्ता, शाखाध्यक्ष जीवन सारसर, उपाध्यक्ष पवन खरारे व ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.