भुसावळात पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारींच्या पुतळ्याचे दहन
पंतप्रधानांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध : पाकिस्तानचा ध्वजही जाळला
Burning effigy of Pakistan Foreign Minister Bilawal Zardari in Bhusawal भुसावळ : भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परीषदेत दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला चांगलेच फटकारल्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तानमधील परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करीत त्यांचा उल्लेख अपमानजनक केल्याने देशभरात बिलावर भुट्टो यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भुसावळातील स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळत बिलावत भुट्टो झरदारी यांच्या प्रतिमा जाळत त्यांचा निषेध नोंदवला.
पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाजवळील चौफुलीवर शनिवारी दुपारी एक वाजता झालेल्या आंदोलनादरम्यान पदाधिकार्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. प्रसंगी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला-जोडे मारत दहन करण्यात आले व पाकिस्तानी ध्वजही जाळण्यात आला. प्रसंगी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परीसर दणाणला.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्यासह भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अमोल महाजन, दिलीप कोळी, संजय पाटील, सुनील महाजन, माजी नगरसेवक विजय चौधरी, राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, प्रा.दिनेश राठी, बापू महाजन, किशोर पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण सोयंके, बिसन गोहर, शंकर शेळके, रामदास सावकारे, अर्जुन खरारे, प्रा.विलास अवचार, अनिल पाटील, चंद्रशेखर अग्रवाल, भावेश चौधरी, महिला मोर्चाच्या अनिता आंबेकर, मनिषा पाटील, भारती वैष्णव, शिशिर जावळे, चंद्रशेखर पाटील, रवींद्र दाभाडे, राहुल तायडे, गौरव आवटे, सुभाष मेंबर, सचिन सपकाळे, नंदकिशोर बडगुजर, श्रेयस इंगळे, किरण मिस्त्री, सागर चौधरी, संजय शिरसाट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.