भुसावळात पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यास शिविगाळ ; एकास अटक

0

भुसावळ- गटारी स्वच्छ करीत नाहीत, तुम्ही कामचूकार आहात, असे म्हणत नगरपालिका सफाई कर्मचार्‍यास शिविगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी विलास काशिनाथ जाधव (वय 45 रा. कृष्णा नगर भुसावळ) यास अटक करण्यात आली. शहरातील जूनी इदगाह, साई डेअरी भागात पालिकेचे स्वच्छता कर्मचारी तथा तक्रारदार आनंदा रामदास तुरकेले (रा. वाल्मिक नगर, भुसावळ) हे त्यांच्या सहकार्‍यांसोबत 30 मार्च रोजी रात्री नऊ ते 11 वाजेदरम्यान जूनी इदगाह, साई डेअरी गोरखनाथ मंदिराजवळ स्वच्छता करीत असताना संशयीत आरोपीने तुम्ही नगरपालिका कर्मचारी निट गटारी साफ करीत नाही, कामचूकार आहात, असे सांगत शिविगाळ करुन अंगावर धावले. या प्रकरणी शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी जाधव यांना अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका खैरनार करीत आहे.

भुसावळ : गटारी स्वच्छ करीत नाहीत, तुम्ही कामचूकार आहात, असे म्हणत नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यास शिविगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी विलास काशिनाथ जाधव (वय ४५ रा. कृष्णा नगर भुसावळ) यास अटक करण्यात आली. शहरातील जूनी इदगाह, साई डेअरी भागात पालिकेचे स्वच्छता कर्मचारी तथा तक्रारदार आनंदा रामदास तुरकेले (रा. वाल्मिक नगर, भुसावळ) हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ३० मार्च रोजी रात्री नऊ ते ११ वाजेदरम्यान जूनी इदगाह, साई डेअरी गोरखनाथ मंदिराजवळ स्वच्छता करीत असताना संशयीत आरोपीने तुम्ही नगरपालिका कर्मचारी निट गटारी साफ करीत नाही, कामचूकार आहात, असे सांगत शिविगाळ करुन अंगावर धावले. या प्रकरणी शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी जाधव यांना अटक करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका खैरनार करीत आहे.