भुसावळ- शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीला लग्नाच्या आमिषाने पळवून नेल्याप्रकरणी संशयीत आरोपी विशाल सुनील रायमळे (आंबेडकर नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली. अल्पवयीन तरुणी बारावीचे शिक्षण घेते व तिला 23 रोजी रात्री 12.30 ते अडीच वाजेदरम्यान संशयीत आरोपीने लग्नाच्या आमिषाने पळवून नेल्याची तक्रार तरुणीच्या आईने दिल्यानंतर विशाल रायमळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रविवारी सायंकाळी आरोपी व तरुणी शहर पोलिसात हजर झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली तर तरुणीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीस सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास उपनिरीक्षक वैभव पेटकर करीत आहेत.