भुसावळात गुन्हे शाखेने पकडला गावठी कट्टा

0

जळगाव गुन्हे शाखेची धडक कारवाई : शहर ठरतेय शस्त्र तस्करीचे केंद्र

भुसावळ : रविवारी सायंकाळी शहरातील एकाकडून पुन्हा गावठी कट्टा जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आरबाज आरीफ पटेल (22, पटेल कॉलनी, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफोद्दीन काझी, युसून शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव आदींच्या पथकाने केली. दरम्यान, आतापर्यंत शहरातून पाच गावठी कट्टे जप्त करण्यात आले असताना पुन्हा कट्टा आढळल्याने शहरवासीयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.