भुसावळ- शहरातील हुडको कॉलनी भागातील बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत 39 हजारांचा मुद्देमाल लांबवला. सेवानिवृत्त कर्मचारी आशिशकुमार उपेंद्रनाथ बोस हे त्रिमूर्ती पेट्रोल पंपामागील हुडको कॉलनीतील घर क्रमांक आठमध्ये राहतात. 13 रोजी ते कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी चोरट्यांनी साधत सायंकाळी सहा ते साडेसात वाजेच्या सुमारास चॅनलचे गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत बेडरूममधील शोकेसचे कुलूप तोडून त्यातील 10 ग्रॅम वजनाची व 30 रुपये किंमतीची सोन्याची चैन तसेच नऊ हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅमचे कानातले लांबवले. एकूण 39 हजारांचा ऐवज लांबवल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल विठ्ठल देशमुख करीत आहेत.