भुसावळात पुन्हा घरफोडी : 60 हजारांचा ऐवज लांबवला

0

भुसावळ : शहरात घरफोड्यांचे सत्र थांबायला तयार नाही. पोलिसांची गस्त भेदून चोरटे सातत्याने चोर्‍या करीत असल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. शहरातील रेल दुनिया परीसरातील न्यू हुडको कॉलनीतील सेवानिवृत्त कर्मचारी गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 60 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी व तक्रारदार प्रकाश तुकाराम तायडे (न्यू हुडको कॉलनी, रेल दुनिया, भुसावळ) हे गावाला गेल्याची संधी चोरट्यांनी 26 ते 27 ऑगस्ट दरम्यान घराचे कुलूप तोडत 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 15 हजार रुपये किंमतीचे व 6 ग्रॅमचे मंगळसूत्र तसेच पाच हजार रुपये किंमतीची अडीच ग्रॅमची सोन्याची रींग, पाच हजारांचे चांदीचे दागिने, एक हजार 500 रुपये किंमतीचे पायातील जोड, आठ हजारांची रोकड मिळून एकूण 59 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.