भुसावळात पुन्हा धाडसी घरफोडी

0
भुसावळ : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र थांबायला तयार नाही. पोलिसांच्या गस्तीलाच चोरटे आव्हान देऊन काम फत्ते करीत असल्याने शहरवासीयांमध्ये घबराट पसरली आहे.
शहरातील ताप्ती क्लबजवळील रहिवासी व रेल्वेच्या पीओएचमधील सिनी.सेक्शन इंजिनिअर विनोद तानकू जगदेव (54) हे बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधत एक लाख चार हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जगदेव यांच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ते धुळे येथे रवाना. चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत कडी-कोयडा व कुलूप तोडत गोदरेज कपाटातील 40 हजार 500 रुपयांची रोकड व 32 ग्रॅम वजनाचे तसेच 64 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. जगदेव दाम्पत्य शुक्रवारी रात्री घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.