भुसावळात पोलिसांकडून हॉटेल, लॉजेसच्या तपासणीने खळबळ

0

भुसावळ- शहरातील बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील हॉटेल्ससह लॉजेसची पोलिसांनी रविवारी सकाळपासून धडक तपासणी मोहिम सुरू केल्याने लॉज चालकांमध्ये खळबळ उडाली. लॉजमध्ये आलेल्या प्रवाशांचे नाव, पत्ता तसेच पुरावा आदींबाबत माहिती घेण्यात आली तसेच जामनेर रोडवरील एका लॉजमधील तीन जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर 110 व 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली. ही नियमित तपासणी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यापुढेही शहरात हॉटेल्स व लॉजेसची अचानक तपासणी मोहिम राबवली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी दिली. हॉटेल्स व लॉज मालकांनी सर्व नियमांचे पालन करून प्रवाशांना लॉजमध्ये आसरा द्यावा, असेही ते म्हणाले.