भुसावळात पोलिसांचा रूट मार्च

Police route march in Bhusawal भुसावळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरात पोलिसांनी मंगळवारी दुपारी रूटमार्च काढला. शहरातील नेहरू मैदानापासून रूटमार्चला सुरूवात झाली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली रूटमार्च निघाला.

शहरातील विविध मार्गावरून रूट मार्च
बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, शहरचे निरीक्षक गजानन पडघन, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक यांच्यासह दुय्यम अधिकारी, होमगार्ड, पोलिस, आरसीपी प्लॉटून, ट्रेनिंग सेंटरचे पोलिस आदी रूट मार्चमध्ये सहभागी झाले. नेहरू मैदानापासून सुरू झालेला रूटमार्च हा विसर्जन मार्गावरून जात बाजारपेठ पोलिस ठाणे, दगडी पूल, गवळीवाडा, जळगाव रोड, टेक्निकल हायस्कूल, तहसील कार्यालय, गांधी पुतळ्यावरून शहर पोलिस ठाण्याजवळ आल्यानंतर रूटमार्चचा समारोप झाला. यावेळी रूटमार्च पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.