गुन्हेगारांच्या उरात भरली धडकी
भुसावळ- आगामी मार्च महिन्यात येत असलेल्या शिवजयंतीसह होळी, धुलिवंदन, महावीर जयंती, गुड फ्रायडे व अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी पोलिसांनी शहरात बुधवारी सायंकाळी पथसंचलन (रूट) मार्च केल्याने गुन्हेगारांच्या उरात धडकी भरली.
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या डीवायएसपी कार्यालयापासून रूट मार्चला सुरुवात झाली. यात रॅपीड अॅक्शन फोर्सचे हत्यारधारी कर्मचारी तसेच शहरातील तीनही पोलीस ठाण्यांच्या अधिकार्यांसह कर्मचारी सहभागी झाले. यावल रोड, जामनेर रोड, जाम मोहल्ला, सराफा बाजार आदी भागातून पोलिसांनी रूट मार्च केला.