भुसावळात पोलिसांनी केली धडक कारवाई

0

भुसावळ। उत्सवाच्या पाश्‍वभुमीवर तसेच शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांनी शहर व तालुक्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने ठिकठिकाणी कारवाईचे सत्र सुरु करण्यात आले आहे. याअंतर्गत गुरुवार 13 रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास ईराणी मोहल्ल्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवून एका अल्पवयीन आरोपीस अटक केली तर इतर सहा जणांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर दुसर्‍या घटनेत दुचाकी चोरी प्रकरणी दोन संशयीत आरोपींसह मध्य प्रदेशातून चोरी करुन आणलेली पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये काही नागरिकांनी मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार दिल्यावरुन याचा शोध घेण्यासाठी काही संशयीतांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता मध्यप्रदेशातून दुचाकीची चोरी करुन त्या लपवून ठेवल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली. बाजारपेठ पोलीसांनी यासंदर्भात संशयीत आरोपींची झाडाझडती घेतली.

शहरातील दुचाकी चोरीस गेल्याच्या तक्रारीवरुन तपास
यावेळी पोलीसांनी संशयीत आरोपींना कारवाईचा धाक दाखविताच त्यांनी पाच दुचाकी चोरल्या असल्याची कबुली दिली. पोलीसांनी यात दोन्ही आरोपींसह दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान यासह इतरही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भुसावळ शहरात मोठया प्रमाणावर दुचाकी वाहने चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलीसांकडे आल्या होत्या.

चेसीसची खोडाखाड
यासंदर्भात बाजारपेठ पोलीसांनी नियमित चौकशीदरम्यान संशयीत आरोपींना वाहन परवान्यासह इतरही कागदपत्रांची माहिती घेतली मात्र त्यांच्याकडे या वाहनाचे काहीही कागदपत्र आढळून आलेले नाही. तसेच वाहनावरील चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांक खोडण्यात आले असल्याचे आढळून आले. आरोपींनी मध्यप्रदेशातून या दुचाकी चोरल्या असून बाजारपेठ पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता. मयूर विलास उर्फ उल्हास भंगाळे (गरूड प्लॉट, भुसावळ) व पुष्पक गोपाळ भंगाळे (भुसावळ हायस्कूलजवळ) यांनी या दुचाकी लपविलेल्या ठिकाणाची माहिती दिली. यानंतर पोलीसांनी श्रीनगर परिसर, रेल्वे केला साईडिंग परिसरात असलेल्या रेल्वेच्या वाहनतळाजवळ लावलेली आढळून आली. तर मयुर भंगाळे याच्याकडून बुलेट जप्त केली आहे. यातील बहुतांश वाहनांवर नंबर प्लेट काढण्यात आली
असल्याचे दिसून आले.

अत्याचारातील अल्पवयीन संशयीत ताब्यात
जिल्हाभरात सुरू असलेल्या सोनसाखळी लांबविण्याच्या घटनांच्या पाश्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील इराणी वस्तीत गुरुवार 13 रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवल़े या कोम्बिंगमध्ये चार महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या अत्याचार केल्या प्रकरणी संशयीत अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आले. तर अन्य सहा इराणींना देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये नियाज अली इराणी (वय 22), समशेर अली अफसर अली, गुलाम हुसेन हैदर नाफर इराणी, कबरअली आझाद अली, अली शौकत अली इराणी (वय 32), कबरअली शौकत अली इराणी (वय 23) यांचा समावेश आहे. तसेच एक दुचाकीही जप्त करण्यात आली़ ही दुचाकी इराणी मोहल्ल्यातील एका झोपडीत लपवून ठेवली असल्याचे आढळून आल्यामुळे ती चोरीची असल्याचा पोलिसांना संशय आह़े सहा आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली़

यांनी केली कारवाई
तर एक गाडी रेल दुनिया परिसरात असलेल्या विहीरीत फेकली असल्याचे आढळून आले. भुसावळातून दुचाकी चोरी केल्याच्या गुन्ह्यात या आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र त्यांनी मध्यप्रदेशासह अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली़. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश बाविस्कर, राहुल चौधरी, दीपक जाधव, बंटी कापडणे, प्रशांत चव्हाण, हवालदार युनूस शेख आदींच्या पथकाने दुचाकी लपवून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन हि वाहने ताब्यात घेतली.