भुसावळ :- चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या दोघा कर्मचार्यांवरच आरोपीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बोहरी कब्रस्थानसमोर घडली.
या घटनेने आरोपीने काही धारदार वस्तू डाव्या भुवईजवळ मारून घेतल्याने तो आरोपी जखमी झाला तर पोलिसांनी आरोपीला अटक करीत पोलीस ठाण्यात आणले. बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी शेख चाँद शेख हमीद यास पकडण्यासाठी एएसआय आनंदसिंग पाटील व कॉन्स्टेबल विकास सातदिवे गेल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.