भुसावळ (प्रतिनिधी) – घराच्या भिंतीवर जिना काढल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असता हे प्रकरण आपसात मिटविण्यासाठी २ हजार रुपयाच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती हजार रुपयाच्या लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक रामा वसतकर यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवार ६ रोजी रंगेहाथ अटक केली. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारदाराने आपल्या घराच्या भिंतीवर जिना काढल्याने तक्रारदाराच्या भाऊ व वहिणीने वाद करुन शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी तक्राराच्या घरी पोलीस उपनिरीक्षक रामा वसतकर हे आले व जिना काढ्याचे सांगितले मात्र तक्रारदाराने सदर जिना हा आपल्या हद्दीतच असल्याचे स्पष्ट केल्याने वसतकर यांनी अटक न करता प्रकरण मिटवून टाकण्यासाठी २ हजार रुपयांच्या लाचेची
मागणी केली.