भुसावळ : जिल्हाधिकार्यांनी नायलॉन मांजा विक्री व बाळगण्यास बंदी केली असताना शहरातील सिंधी कॉलनीत त्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक धाड टाकून हर हर महादेव दुकान चालक उमेश लोकचंद छाबडिया (27, रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) यास अटक केली. संशयीताच्या ताब्यातून एक हजार आठशे रुपये किंमतीचा प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. दरम्यान, अटकेतील आरोपीकडून एक हजार सहाशे रुपये किंमतीच्या मांजाने भरलेल्या दोन चक्री तसेच मांजा नसलेल्या दोनशे रुपये किंमतीच्या पाच चक्री जप्त करण्यात आल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड. नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील आदींच्या पथकाने केली.