43 तक्रारींचा निपटारा : चार लाख 27 हजार 937 रुपयांची रक्कम वाटप
भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फैलाव टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे प्रथमच ऑनलाईन पेन्शन अदालतीचे आयोजन सोमवारी करण्यात आले. अदालतीत एकूण 43 तक्रारी प्राप्त झाल्या तर एकूण चार लाख 27 हजार 937 रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
पेन्शन अदालतीचे मुख्य न्यायाधीश तथा डीआरएम विवेककुमार गुप्ता, अपर मंडळ रेल प्रबंधक मनोजकुमार सिन्हा, लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्तावि वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी तर सूत्रसंचालन सहा.कार्मिक अधिकारी (कल्याण) राजेंद्र परदेशी यांनी केले. नाशिक पेन्शनर्स असोसिएशन अध्यक्ष एस.जी.कुलकर्णी यांनी पेन्शनधारक व प्रशासनाच्या समस्या निवारण संबंधी सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. या कोरोना काळातही प्रशासन पेन्शनरांच्या तक्रारींचे निराकरण करीत असल्याने त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. आभार सहायक कार्मिक अधिकारी वीरेंद्र वडनेरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.