भुसावळ- प्रधानमंत्री जनआरोग्य आयुष्यमान भारत योजनेच्या 237 लाभार्थींना प्रभाग सातमध्ये नगरसेवक मुकेश पाटील यांच्या हस्ते गोल्ड कार्डचे वाटप करण्यात आले. पालिकेच्या शाळा क्रमांक दोनमध्ये छोटेखानी कार्यक्रमात या कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका अनिता सतीश सपकाळे यांची उपस्थिती होती. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचाराची मोफत सुविधा मिळणार आहे. प्रभागातील नागरीकांनाही या योजनेचा मिळण्यासाठी नगरसेवक मुकेश पाटील यांनी पाठपुरावा करीत पात्र लाभार्थींचे सर्वेक्षण करून 237 लाभार्थींना आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डाचे वाटप करण्यात आले.