भुसावळात फुटओव्हर ब्रिजचे काम करताना ओएचईच्या धक्कयाने मजूर भाजला

0

भुसावळ- रेल्वेच्या नागपूर साईडकडील आरसी कॅबीनजवळ प्रशासनाकडून सुरू असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर वेल्डींगचे काम करीत असताना 25 वर्षीय मजूर कोसळला. ओव्हर ब्रिजवरुन कोसळतानाच त्याला ओएचईचा इलेक्ट्रीक शॉप लागल्याने 40 टक्के भाजला गेला. सोमवारी पावणेपाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याने रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली.

ओव्हर ब्रिजच्या कामादरम्यान दुर्घटना
आरसी कॅबीनजवळ फूट ओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे. या ब्रिजवर वेल्डींगचे ठेकेदाराकडे असलेला मजूर दीपक खरात (25 रा. भुसावळ) खाली कोसळला. याच दरम्यान ओएचईचा शॉक लागल्याने तो 40 टक्के भाजला गेला. जखमी अवस्थेत खरात यास शहरातील डॉ. राजेश मानवतकर यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ हलवण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यास गोदावरी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. संबधीत मजूर दीपक खरात हा मनवानी नामक ठेकेदाराकडे काम करीत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान दीपकवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी ओएचई विभागाचे सीनिअर सेक्शन इंजिनिअर आर.के.पांडेय, सिनिअर डीईएन तोमर आदींनी भेट देवून पाहणी केली.