भुसावळात बंदी असताना चिनी व नॉयलॉन मांजची विक्री

0

भुसावळ- चिनी आणि नायलॉन मांजाच्या निर्मितीसह विक्री आणि वापरावर बंदी असलीतरी शहरात मात्र चिनी व नायलॉन मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू आहे. चिनी आणि नॉयलॉनच्या मांज्यामुळे राज्यात काही मुले जखमी झाली होती तर काहींचे बळीही गेले. पक्ष्यांसाठी तर हा मांज्या म्हणजे मृत्यूचे सापळा ठरल्याने त्याच्या विक्रीसह वापरावर बंदी आली होती मात्र भुसावळसह तालुक्यात नियमाला धाब्यावर बसवण्यात आल्याने कारवाईची मागणी भुसावळ युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील यांनी केली आहे.

भुसावळात अपघात टळला
राष्ट्रीय महामार्ग सहावर रेल्वे पुलाजवळ नुकताच मोठा अपघात होतांना वाचला. दोन दुचाकीस्वारांच्या अचानक गळ्याशी मांजा आल्याने त्यांना छोटी इजा झाली. चालकाने हेल्मेट घातले असल्याने दुचाकीस्वाराला मोठी इजा झाली नाही परंतु मागे येणार्‍या दुचाकीस्वाराला डोळ्याजवळ ईजा झाल्याचे सांगण्यात आले.