भुसावळात बसच्या धडकेत शिक्षक गंभीर जखमी

0

भुसावळ– भुसावळ- बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक जखमी झाल्याची घटना शहरातील अष्टभूजा मंदिराजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात डी.एल.हिंदी विद्यालयाचे शिक्षक गणेश देविदास तेली (31, शिव कॉलनी, संत धामजवळ, भुसावळ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोणार्क रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यवतमाळ-जळगाव बस (5685) जळगावकडे जामनेर रोडवरून जात असताना दुचाकी (एम.एच.19 बीए 9358) ला फटका बसल्याने शिक्षक तेली गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी व डिगंबर चौधरी यांनी धाव घेत तेली यांना खाजगी रुग्णालयात हलवले. अपघातानंतर अन्य बसने प्रवाशांना जळगावपर्यंत रवाना करण्यात येऊन बस भुसावळ आगारात जमा करण्यात आली. अपघातानंतर बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक मनोज पवार, संजय भदाणे, दीपक पाटील यांनी धाव घेतली. जखमी जवाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.