भुसावळात बसमध्ये चढताना विवाहितेचा मोबाईल लांबवला ; चोरट्यास अटक

0

भुसावळ- बसमध्ये चढताना महिलेचा मोबाईल लांबवणार्‍या ईब्राहीम बेग नुर बेग (26, रा.आगाखान वाडा मिल्तनगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांच्या डीबी शाखेेने शुक्रवारी अटक केली. तक्रारदार महिला स्नेहल उल्हास गाजरे (24 रा.गिरीजा कॉलनी, जामनेर) या 28 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास भुसावळ बसस्थानकातून जामनेर जाण्यासाठी औरंगाबाद बसमध्ये चढत असताना त्यांचा 28 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवण्यात आला होता. त्यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर डीबी शाखेने आरोपीच्या गुरुवारी रात्री मुसक्या आवळल्या असून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, सुनील थोरात, दीपक जाधव, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, योगेश माळी, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, संदीप परदेशी, समाधान पाटील आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.