भुसावळात बसवर दगडफेक, 11 तरुणांना अटक

0

भुसावळ: भीमा-कोरेगाव घटनेनंतर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर भुसावळ येथे बहुजन समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर हिंसक जमावाने जामनेर रोडवरील काही दुकानांवर दगडफेक करत दुचाकींसह लोटगाड्या उलथवल्या तर पांडुरंग टॉकीजसह खडका रोड भागात बसवर दगडफेक झाल्याने भुसावळ आगाराचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी स्वतंत्र दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या असून 11 तरुणांना अटक करण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये किशोर लोखंडे, आकाश सपकाळे, अमोल वानखेडे, भगवान गायकवाड, तुषार वाघ, विशाल सपकाळे, नितीन वाघ, आकाश वानखेडे, श्रावण देवरे, विजय पवार, चेतन आव्हाड यांचा समावेश आहे. जामनेर रोडवर दगडफेक करणार्‍या तरुणांचा सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

शहर शांततेचे आवाहन
भुसावळ शहरातील नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये तसेच शहर शांत ठेवावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍यांवर आम्ही नजर ठेवून असल्याचेही ते म्हणाले.