भुसावळात बाजारपेठ पोलिसांतर्फे अडीच लाखांची दारू नष्ट

0

भुसावळ- बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलि निरीक्षक देविदास पवार यांनी प्रोव्हीशनच्या दाखल विविध गुन्ह्यातील जप्त केलेला दारूसाठा नष्ट करण्यासाठी भुसावळ न्यायालयात केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. न्यायालयाच्या आदेशानंतर हा दारूसाठा मंगळवार, 2 जुलै रोजी दुपारी पोलिस लाईन भागात नष्ट करण्यात आला.

देशी-विदेशीसह बिअरसाठा नष्ट
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध दाखल प्रोव्हीशनच्या गुन्ह्यातील सुमारे तीन वर्षांपासून जप्त केलेला दारू साठ्याचा मुद्देमाल पोलिस ठाण्यात पडून होता. पोलिस निरीक्षक पवार यांनी हा साठा लवकर नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे 2 जुलै रोजी पोलीस लाईन भागात देशी-विदेशी दारू व बिअर असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल जमिनीत पुरून नष्ट करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाघ, एएसआय.एजाज पठाण, युवराज नागरूत, नरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.