भुसावळात बाजारपेठ पोलिस ठाण्यातील हवालदाराला पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली

0

भुसावळ : कोरोनामुळे भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील हजेरी मास्तराचा मृत्यू झाल्यानंतर या कर्मचार्‍यास कर्मचार्‍यांतर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली तसेच पोलिस ठाण्याच्या परीसरात निर्जंतुकीकरणही करण्यात आले. हजेरी मास्तर असलेल्या पोलिस हवालदाराचा बुधवारी सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू ओढवला होता तर जिल्हा पोलिस दलातील हा कर्मचारी कोरोनाचा पहिला बळीदेखील ठरला होता. अतिशय मनमिळावू व सुस्वभावी कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली

जळगावात अंत्यसंस्कार
डीवायएसपी गजानन राठोड, निरीक्षक दिलीप भागवत यांनी जळगाव हॉस्पीटलमधून मृत पोलिस कर्मचार्‍याची माहिती घेतली तर या कर्मचार्‍यावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली असा परी असून गुरूवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मृत पोलिस कर्मचारी यांना बाजारपेठ पोलिसांतर्फे पोलिस ठाण्याच्या आवारात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व अन्य अधिकारी उपस्थित होते.