भुसावळ : शहरातील आनंद नगर भागातील बीएसएनएल कंपनीच्या कार्यालयातून चोरट्यांनी सहा हजार रुपये किंमतीच्या कॉपर वायर लंपास केल्याची घटना 7 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बीएसएनएलचे सहा हजारांचे नुकसान
आनंद नगर भागातील हॉटेल रंगोलीजवळ बीएसएनएल कार्यालय आहे. या कार्यालयाचा दर्शनी भागाचा दरवाजा उघडून चोरट्याने टेबलावर ठेवलेल्या सहा हजार रुपये किंमतीच्या कॉपर्स वायर्स 7 रोजी लांबवल्या. सकाळी 10 वाजता कंत्राटी कर्मचारी सतीश बोदडे हा कामावर आल्यानंतर त्याच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने त्यांनी मो.शेख यांना माहिती कळवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात कनिष्ठ दूरसंचार अधिकारी मोहम्मद रीजवान शेख (गल्ली नंबर तीन, नुराणी मशिदीजवळ, खडका रोड, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.